जयंत पाटलांनी विधानपरिषद सभापती पदावर दिले वेगळेच संकेत!

107

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ह्या सरकारच्या आगामी व्युहरचनेचा जणू उलगडाच केला, निदान एक वर्षे तरी विधानपरिषदेचे सभापती सासरे आणि विधानसभा अध्यक्ष जावई ठेवा असे सांगून विधानपरिषद सभापती पदावरून वेगळेच संकेत दिले.

(हेही वाचा अबू आझमींना नव्या अध्यक्षांची तंबी! )

काय म्हणाले जयंत पाटील? 

विधानपरिषदेचे सभापती सासरे आहेत आणि विधानसभा अध्यक्षपदी जावई. जावई हा सासऱ्याच्या दशम स्थानी असतो, असे म्हटले जाते. २१व्या शतकात खरे तर कुंडली, ज्योतिष वगैरे फार महत्वाचे मानले जात नाही. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस हे बदलतील आणि पुढील वर्षभर तरी विधानपरिषदेत सासरे आणि विधानसभेत जावई हे कायम ठेवतील, अशी अपेक्षा आहे आणि अंधश्रद्धाळूंना खोटे ठरवतील. कारण लवकरच विधान परिषदेतील १२ आमदारांची राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी पाठवतील. तरीही एक वर्ष तरी तुम्ही हे चित्र कायम ठेवून देशभरात हा आदर्श दाखवून द्याल, असे सुचवले.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! विधानसभेत तुफान फटकेबाजी)

काय आहे पाटलांच्या संकेतांमागील राजकारण? 

विधानपरिषदेत सध्या भाजपाचे २४ संख्याबळ आहे. आता राज्यपाल नियूक्त १२ सदस्य येतील, त्यात रासप १, अपक्ष २ असे मिळून ३९ संख्याबळ होईल. विधान परिषदेत एकूण ८ संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजपाचे बहुमत होणार आहे. अशावेळी भाजपा सहज विधानपरिषद सभापती पदावरही दावा करून तेही पद घेऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी निदान विधानपरिषदेतील सभापती पद एक वर्ष तरी कायम ठेवावे, अशी अप्रत्यक्ष विनंती केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.