Rahul Narvekar म्हणतात, आमदार अपात्रतेवर दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसारच

168

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी विसंगत नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केला. यावरून ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. आपण दिलेला निर्णय १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसारच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा Mahashivratri : महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का बसून १४ मुले गंभीर जखमी)

काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

या प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यापुढे सादर करण्यात आलेले मूळ दस्तावेज मागवून घेतले आहेत. मूळ पक्ष कोणता हे ठरविताना विधिमंडळातील बहुमताची तुलना पक्ष संघटनेतील बहुमताशी करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिले. पक्षात फूट पडल्यानंतर खऱ्या पक्ष विधिमंडळ पक्षाची ओळख बहुमतातून ठरते, असे राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) म्हटले होते. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी प्रश्नचिन्ह लावले. प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाला जर हे पटले असते की, मी दिलेला निर्णय त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आहे, तर त्यांनी ऑर्डर केली असती. मी दिलेला निर्णय हा १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषानुसारच आहे. केवळ एखादी विशिष्ट ओळ घ्यायची, संपूर्ण निकाल पाहायचा नाही. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, या विषयात खोलात जाऊन विचार करायची गरज आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने कधीच म्हटले नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.