विधानसभा अध्यक्षपदासाठी Rahul Narvekar यांचा उमेदवारी अर्ज दाखल

123
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी रविवार ०८ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते. (Rahul Narvekar)
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, विरोधी पक्षांकडूम एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. या मुदतीत मविआकडून एकही उमेदवारी अर्ज आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

(हेही वाचा – Nashik Bus Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली)

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपाला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ २३६ इतकं झालं आहे. महायुतीकडे मोठं संख्याबळ असल्यानं विधानसभा अध्यक्ष तीन पक्षांमध्ये कुणाकडे जाणार याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपाकडे जाणार आहे. भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्चित झालं आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.