राजकीय फटाके फुटायला अजून वेळ; Rahul Narvekar यांचे आमदार अपात्रतेच्या मुद्यावर भाष्य

113

मुंबईच्या कुलाबा कोळीवाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना त्यांनी दिवाळीच्या फटाक्यांसह राजकीय फटाक्यांवर भाष्य केले. राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात, परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणे उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ३१ डिसेंबरच्या राजकीय फटक्यांबाबत प्रश्न विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका, राजकीय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. जनसामान्यांना अपेक्षित निर्णय होणे गरजेचे आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना ते संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत.

(हेही वाचा पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणातील आरोपी कोणते वापरायचे कोडवर्ड?)

आमदार अपात्रतेच्या निर्णयाबाबत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले, असे निर्णय शास्वत ठरायला हवेत. हे निर्णय टिकून कसे राहतील, याचा विचार करणे अपेक्षित आहे. आपले सरकार संवेदनशील आहे, विधीमंडळही संवेदनशील आहे. त्यामुळे येत्या काळात आपण एक शास्वत आणि टिकाऊ निर्णय घेऊ. त्याला विधीमंडळाची साथ मिळेल. राजकीयदृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कायद्यात असणाऱ्या तरतुदी, संविधानातील तरतुदींचे पालन केले जाईल, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.