Rahul Narwekar यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सोमवारी होणार अधिकृत घोषणा

50
Rahul Narwekar यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सोमवारी होणार अधिकृत घोषणा
Rahul Narwekar यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड; सोमवारी होणार अधिकृत घोषणा

विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा एकमेव अर्ज विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल झाला. विरोधकांकडून एकही अर्ज न झाल्याने नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार असून सोमवारी अधिकृत याची घोषणा होईल. दरम्यान, गेली अडीच वर्ष नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळल्याने पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी सोमवारी निवड होणार आहे. या रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. महायुतीकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचा अर्ज विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थिती होती. तर संख्याबळाअभावी महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नावावर अध्यक्ष म्हणून जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचा – Aaditya Thackeray यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी?)

महायुती सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर अडीच वर्ष काम केल्यानंतर, नव्या सरकारमध्ये नार्वेकर मंत्री पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना असलेला सभागृहाचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन, अध्यक्ष पदासाठी विचारणा केली. मात्र, दोन्ही नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली. परंतु, भाजपाने शेलार यांच्या ऐवजी पुन्हा एकदा नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेतला. अडीच वर्षात दोन पक्ष फुटल्यानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय स्थितीत नार्वेकर यांनी सभागृहाचे काम केल्याचा भाजपाचा दावा असून त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.