बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाची दखल घेण्याची विनंती केली. याबाबत केंद्र सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर योग्य तो तोडगा काढावा, अशी लेखी विनंती केली.
पत्रात काय म्हणाले खासदार शेवाळे?
खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमाविवादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित/विचाराधीन आहे. दोन्ही राज्यांमधील सीमावादाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. मात्र बेळगावात अराजक निर्माण करणारी संघटना आणि काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्याचे काम करत आहेत, जे निषेधार्ह आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन्ही राज्यांतील सीमावादाची परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाच्या प्रकरणाकडे स्वतः लक्ष घालून भारत सरकारला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, ज्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेला सीमावाद सुटेल, असे खासदार शेवाळे म्हणाले.
(हेही वाचा चीनच्या वेबसाईट केल्या हॅक, ‘बोलो पावभाजी’ चर्चेत)
Join Our WhatsApp Community