शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी (१४ डिसेंबर) नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार शेवाळे यांच्या पत्नी कामिनी राहुल शेवाळे, स्वयम आणि वेदांत ही दोन मुले उपस्थित होती. यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. तसेच गेल्याच महिन्यात मातृशोक झालेल्या खासदार शेवाळे यांचे मोदी यांनी सांत्वन देखील केले. (Rahul Shewale Meet PM Modi)
(हेही वाचा – Mill Workers Mhada Lottery : आतापर्यंत ७२,०४१ अर्जदार पात्र, मुदतवाढ १४ जानेवारीपर्यंत)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिल्पाकृती भेट
या भेटीदरम्यान खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिल्पाकृती आणि समग्र सावरकर ग्रंथाचे खंड भेट म्हणून दिले. भेटी नंतर पत्रकारांसोबत बोलताना खासदार शेवाळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने नवी ऊर्जा मिळाली. माझ्या लोकसभा मतदारसंघातील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत देखील या भेटीत चर्चा झाली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील यावेळी पंतप्रधानांना दिली. (Rahul Shewale Meet PM Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community