मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळावा ही गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याबाबत नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा-Raj Thackeray : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट; म्हणाले…)
राहुल शेवाळे (Rahul Shewale) ट्विट करत म्हणाले, “अजी सोनियाचा दिनु…! मातृशक्तीचा जागर साजरा करणाऱ्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या माय मराठीला *अभिजात भाषेचा* दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि केंद्र सरकारचे शतशः आभार मानतो.”
अजी सोनियाचा दिनु…!
मातृशक्तीचा जागर साजरा करणाऱ्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्या माय मराठीला *अभिजात भाषेचा* दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि केंद्र सरकारचे शतशः आभार मानतो!
संत ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीला… https://t.co/48WswP0vP2
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) October 3, 2024
“संत ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीला अमृताहुनी गोड मानलं, त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या विविध स्तरांतून केली जात होती. या माय मराठीच्या हक्कासाठी मी वारंवार लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेत आवाज उठवला. सातत्याने पाठपुरावा केला. या यशात माझाही खारीचा वाटा असल्याचं समाधान वाटतंय. आज माझ्यासह तमाम मराठी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं.” असं राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community