अयोध्येच्या श्रीराम मंदिरात अभिमंत्रित केलेल्या धनुष्यबाणासह महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) हे बुधवारी (१७ एप्रिल) वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतिस्थळावर पोहोचले. “अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर यंदाची पहिलीच रामनवमी आहे. म्हणून रामनवमीच्या निमित्ताने स्मृतिस्थळावर येऊन नतमस्तक झालो” अशा शब्दांत राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. स्मृतिस्थळावर नतमस्तक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, शिवसेना विभागप्रमुख अविनाश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विभागप्रमुख अविनाश राणे, निशिकांत पाठारे, जिल्हा महिला संपर्क प्रमुख कामिनी राहुल शेवाळे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, भाजपाच्या माजी नगरसेविका शीतल गंभीर, राजेश्री शिरवडकर, वैशाली शेवाळे अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. (Rahul Shewale)
(हेही वाचा – Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब, दैनंदिन गरजांसाठीही लोकांचा संघर्ष)
अयोध्येतील तपस्वी छावनीचे पीठाधिश्वर जगतगुरु परमहंस आचार्य यांच्या निमंत्रणावरून रामनवमीच्या पूर्वसंध्येला राहुल शेवाळे (Rahul Shewale) अयोध्येत दाखल झाले. मंगळवारी संध्याकाळी राहुल शेवाळे अयोध्येच्या राम मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील संत महंतांनी मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण त्यांना सुपूर्द करत विजयासाठी आशीर्वाद दिला. हा धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे (Rahul Shewale) रामनवमीच्या दिवशी मुंबईत दाखल झाले आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील धनुष्यबाण या स्मृतिस्थळावर ठेवून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि रामनवमी साजरी केली. यांनतर राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. (Rahul Shewale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community