राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. प्रचारसभांचा धडाका उडाला आहे. परिणामी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी पुनर्विकासाला (Dharavi Redevelopment) होत असेलेल्या विरोधामागे कष्टकरी कामगारांचा द्वेष हे मूळ कारण असल्याचा थेट आरोप शिवसेना पक्षाचे उपनेते, माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत हे विधान केले. इतर पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोर्चे का काढले नाहीत? असा सवाल समस्त राहुल शेवाळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. धारावीकरांना अद्ययावत आरोग्यसुविधा मिळू नयेत, अशी उबाठाची इच्छा? मुंबईतील म्हाडा, एसआरए आणि अन्य रखडलेल्या प्रकल्पांची माहिती देतानाच राहुल शेवाळे यांनी अनेक आरोप केले. शेवाळे म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेना पक्षाची सुरुवात करून काही काळासाठी दादरच्या ज्या खांडके बिल्डिंग मध्ये वास्तव्य केले, त्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी उबाठाने कोणताही मोर्चा कधीच नेला नाही. शिवसेना भवनाच्या मागे असलेल्या भिडे बिल्डिंगच्या पुनर्विकासाचे अनेकांचे स्वप्न आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही, ही लज्जास्पद बाब आहे. दादर मधील आर के बिल्डिंग, गोरेगाव मधील पत्रा चाळ, घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगर, वडाळा येथील अनेक जुन्या इमारती, मुंबईतील गावठाण – कोळीवाडा, मुंबईतील निर्वासितांच्या वसाहती या सगळ्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी केवळ आणि केवळ धारावीकरांबाबत खोटी सहानुभूती दाखवत त्यांच्याच पुनर्विकासात खोडा घालते आहे, यामागे नेमकी काय दडले आहे? हा प्रश्न सामान्य धारावीकरांना पडला आहे.
दलित आणि कष्टकऱ्यांच्या धारावीतील सर्व समाजाने वर्षानुवर्ष प्रतिकूल परिस्थितीतच आयुष्य जगावे, त्यांना मूलभूत सुविधा मिळू नये, धारावीकरांना अद्ययावत आरोग्यसुविधा मिळू नयेत, अशी उबाठाची इच्छा आहे का? असा सवाल शेवाळे यांनी केला. (हेही वाचा – Congress कडून संविधानाची थट्टा; PM Narendra Modi यांचा आरोप) रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास रोखण्यामागे नेमका कुणाचा हात ?
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरचा (Ramabai Ambedkar Nagar) पुनर्विकास रोखण्यामागे असलेला विकासक नेमका कोणाचा मित्र आहे? त्या मित्रासह अनेक प्रकल्प रखडवणाऱ्या मुंबईतल्या इतर विकासकांना पाठीशी घालण्यासाठीच उबाठा कडून वारंवार केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आरोप करून खोडा घालण्याचे काम सुरू आहे का? असे प्रश्न धारावीकरांना पडले आहेत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.