शिवसेना आणि शिंदे गटात आता लोकसभेतील गटनेते पदावरुन वाद निर्माण झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी केलेली नियुक्ती चुकीची आहे. हा शिवसेनेवर अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगतानाच शिंदे गटाने लोकसभा गटनेतेपदावर दावा करणारे पत्र 19 जुलै रोजी दिले होते. मग शेवाळेंची नियुक्ती 18 जुलैला कशी झाली, असा सवाल शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी आम्ही लोकसभा अध्यक्षांना जाब विचारणार असून, सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले.
( हेही वाचा :Android वापरकर्ते सावधान! तातडीने डिलीट करा हे 8 डेंजर अॅप्स )
काय म्हणाले विनायक राऊत
शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदावर दावा करणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. हे पत्र लोकसभा पोर्टलवर 20 जुलै रोजी आले. आम्हाला ते 19 तारखेला मिळाले. पण संसदेत गटनेत्यांची लिस्ट लावली आहे. त्यात शेवाळे यांची संसदेतील गटनेते म्हणून 18 जुलैपासून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाने 19 जुलैला पत्र काढले आणि 18 जुलैपासून नियुक्ती म्हटले आहे. ज्या दिवशी पत्र दिले जाते, त्या दिवशीपासून फार फार तर आदेश लागू होतात. या प्रकरणात आधीच नियुक्ती कशी? हा शिवसेनेवर अन्याय झाला आहे. आम्हाला नैसर्गिक न्याय न देता हा निर्णय घेतला आहे. पक्षपाती निर्णय झाल्याची शंका आमच्या मनात आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांना विचारणा करणार आहोत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.