Indian Railway: रेल्वे प्रवाशांनो तिकीटांचे दर वाढणार? संसदेत रेल्वेमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले…

84

भारतीय रेल्वे हे देशांतर्गत प्रवासाचे मोठे माध्यम आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्व वर्गातील लोकं रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. रेल्वेच्या तिकीटाचे दर हे खिशाला परवडणारे असल्याने दररोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी लोकसभेत बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले आहे.

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)

लोकसभेत अश्विनी वैष्णव यांच्या या विधानाने येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांची भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू करण्यात येतील का, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सध्याच्या काळात ५५ टक्के सवलत दिली जात आहे.

पुढे ते असेही म्हणाले, सध्या प्रवाशाच्या भाड्यावर रेल्वेचा प्रतिकिमी खर्च साधारण १.१६ रूपये होतो. मात्र रेल्वे त्यासाठी केवळ ४५ ते ४८ पैसे प्रतिकिमी एवढचे भाडे आकारते. प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून साधारण ५९ हजार कोटी रूपये एवढी सब्सिडी देण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. त्यात आता नव्या ट्रेनचे संचालन आणि रेल्वे मार्गांचा विस्तार केला जात आहे. ट्रेनच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात अजूनही निर्णय घेतले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.