Raj Thackeray यांची पुन्हा शरद पवारांवर टीका; म्हणाले..

88
भूमिका बदलावरून शरद पवारांना लक्ष्य करताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, शरद पवार हे आयुष्यभर भूमिका बदलत गेले, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको भूमिका पण लाजते. मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या नाहीत. या देशामधला पहिला माणूस मी होतो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे अशी भूमिका घेतली. मला ज्या गोष्टी हव्या होत्या, त्याच्याविरुद्ध गोष्टी चालू केल्या. नोटा काय बंद झाल्या, पुतळे काय उभे राहिले, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधातील भूमिकेवर भाष्य केले. तर, 2019 मध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या, त्यामध्ये कलम 370 हटविणे असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दुसऱ्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणीचा व्हिडिओ काढल्यानंतर आता सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यावरुन, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. बॅग तपासली म्हणून काही जणांचे रडूबाई रडू सुरू आहे. पण, निवडणूक आयोगाला समजायला हवे, त्यांच्या हातामधून पैसे सुटत नाही, त्यांच्या बॅगेतून कसे पैसे निघणार, असा टोला राज यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनुशक्ती प्रकल्पाला कोकणामध्ये विरोध केला आहे. आता ऑइल रिफायनरीला विरोध करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या उद्योगपतीला मदत करत आहेत, हे कोणाचे लग्नाला जातात, असा सवालही राज यांनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.