राज ठाकरे पुन्हा मैदानात! ‘असा’ असणार दौरा!

राज ठाकरेंचा हा दौरा नेमका कशा स्वरुपात असेल याची चर्चा आता सुरु झाली आहे. कोरोना काळात शांत असलेले राज ठाकरे आता कुणावर तोफ डागणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

154

राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय करतात, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून, पुढील आठवड्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. १६ ते १८ जुलै असा तीन दिवसांचा राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असणार आहे.

म्हणून नाशिक निवडले!

राज ठाकरेंनी पक्षाची स्थापना केल्यापासून नाशिक हा मनसेचा गड राहिला. तीन आमदार, महापालिकेत सत्ता, असे नाशिककरांनी मनसेला प्रेम दिले. मात्र राज ठाकरेच्या मनसेला हे यश फारकाळ टिकवता आले नाही. आता तर मनसेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके पाच नगरसेवक असून, पुन्हा नाशिकमध्ये मनसेला बळकटी देण्यासाठी राज ठाकरे स्वत: मैदानात उतरणार असून, पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या झंझावाती दौऱ्याला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले होते.

(हेही वाचा : चिपी विमानतळाला पुन्हा नवा मुहूर्त मिळाला! यावेळी विनायक राऊतांनी केली घोषणा!)

…म्हणून राज ठाकरेंच्या दौऱ्याला महत्व!

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये घमासान सुरु असून, फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात सत्ताधारी विरोधक व्यस्त आहे. त्याचमुळे राज ठाकरेंच्या या दौऱ्याला महत्व असून, राज ठाकरेंचा हा दौरा नेमका कशा स्वरुपात असेल याची चर्चा आता सुरु झाली आहे. कोरोना काळात शांत असलेले राज ठाकरे आता कुणावर तोफ डागणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.