मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर राज ठाकरे महायुतीसाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान आता मुंबईत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मोठी जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाचा लोकसभा प्रचार सुरु झाल्यापासून एकत्रित सभा ही पहिलीच सभा असेल. शिवाजी पार्क येथे ही भव्य सभा होणार असून मनसे नेत्यांकडून याबाबत अधिक माहिती समजली आहे. (Raj Thackeray)
शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितले की, “आम्ही काही मतदारसंघांचा आढावा घेतला असून या ठिकाणी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसैनिक प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचारात उतरले असल्याचे दिसून आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी आदी ठिकाणच्या आढाव्यात कार्यकर्ते उत्साहात कामाला लागल्याचे दिसत आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी आम्ही प्रथम अर्ज केला असल्याने परवानगी आम्हालाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Raj Thackeray)
कधी होणार सभा?
येत्या १७ मे रोजी पंतप्रधान मोदी व राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होईल अशी माहिती त्यांनी दिली. या सभेच्या तयारीसाठी एक बैठक घेण्यात आली आहे. आम्ही नेहमीच राज ठाकरेंची सभा घेतो. त्यामुळे आम्ही नेहमीच त्याची तयारी करतो. तरीही कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. काही समस्या जाणून घ्याव्या लागतील. इतर आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. या सर्व बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नांदगावकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे (Raj Thackeray) १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत सर्व उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community