-
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्य सरकार (State Govt) यांची मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत एकच भूमिका असल्याचे आज स्पष्ट झाले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. ही त्यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी दुसरी भेट होती. या भेटीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज ठाकरे यांच्या अपेक्षा आणि सरकारच्या योजनांवर सविस्तर चर्चा झाली.
उदय सामंत (Uday Samant) यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आज मी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दुसऱ्यांदा भेटलो. मराठी भाषेबाबत त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. आपल्याला बँकाही आवश्यक आहेत, पण मुद्दा आहे मराठीत बोलण्याचा. आम्ही चांगल्या बाबींसाठी बँकांसोबत आहोत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकार आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दृष्टी एकच आहे. याच संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनी चेन्नईच्या कर्णधारपदी परतणार?)
मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारने एक समिती स्थापन केली असून, तिचे नेतृत्व जिल्हाधिकारी करणार आहेत. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षकांचाही समावेश असेल. या समितीमार्फत मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “राज ठाकरे आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे की, मराठी भाषेला प्राधान्य मिळायलाच हवे. यासाठी प्रशासकीय स्तरावरही प्रयत्न केले जातील.”
ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता सरकारसोबत त्यांच्या विचारांची सांगड घातली जाणार असल्याने मराठी संवर्धनाला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे. या भेटीतून राजकीय समीकरणे बदलतील की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community