Raj Thackeray : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमदेवार जाहीर

205
Raj Thackeray : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमदेवार जाहीर
Raj Thackeray : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमदेवार जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मनसेने (MNS) दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा –Bihar मध्ये ९ कावड यात्रेकरूंचा डीजेमुळे मृत्यू; नेमकं काय घडलं?)

मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना उमेदवारी दिली आहे. तर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. (Raj Thackeray)

मनसेच्या प्रसिद्धी पत्रकात काय?
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा – नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा.राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.

1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar)
2. पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे (Dilip Dhotre)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.