मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रचारसभांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून २३ ऑगस्ट रोजी मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विदर्भ दौऱ्यात काही महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. गडचिरोलीमधून चंद्रपूरला पोहोचलेल्या राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर वणी मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेचे आतापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत. मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – cyber security course in hyderabad : हैदराबाद सायबर सिक्युरिटी कोर्सची फी किती आहे?)
त्यांना चौरंगा शिक्षा व्हावी…
येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला, तेव्हाच पीडितेच्या न्यायासाठी सर्व जण पुढे आले. आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते, त्यांच्या काळात महिला अत्याचारांवरील घटनांना ज्याप्रमाणे चौरंगा शिक्षा व्हायची, तशीच शिक्षा आजही महिला अत्याचारांतील आरोपींना द्यायला हवी. एक वेळ माझ्या हाती सत्ता द्या.
आतापर्यंत ७ उमेदवार घोषित
चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चंद्रपूर (Chandrapur) आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Election) सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती.
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे ७ उमेदवार
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community