महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. तसेच सध्या सरकार अस्थिर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवीन स्फोट होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मी घरचे काम करायला तयार असल्याची भूमिका घेतली आहे. एका मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
(हेही वाचा – सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’)
राज ठाकरे असे का म्हणाले?
एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला, ‘सक्रीय राजकारणात शर्मिला ठाकरे आल्या तर तुम्हाला चालेल का?’ तर याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मला चालेल. मी घरचे काम करायला तयार आहे.’ त्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘तुमच्या पुढे निघून गेल्या तर तुम्हाला झेपेल.’ यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘चालेल. इथे काही अभिमानची स्टोअरी नाहीये. काही प्रोब्लेम नाहीये. पण तुमच्यानंतर लक्षात येईल की, राज ठाकरे (Raj Thackeray) परवडला.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community