Raj Thackeray: १६ वर्षांपूर्वी दिलेलं चिथावणीखोर भाषण राज ठाकरेंना भोवलं!

155
Raj Thackeray: १६ वर्षांपूर्वी दिलेलं चिथावणीखोर भाषण राज ठाकरेंना भोवलं!
Raj Thackeray: १६ वर्षांपूर्वी दिलेलं चिथावणीखोर भाषण राज ठाकरेंना भोवलं!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निलंगा (Nilanga) येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे.यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. यापूर्वी ही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. सोळा वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

(हेही वाचा –Police : खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्यासाठी पोलिसांनीच ड्रग्जचे पाकीट हळूच टाकले खिशात;  खार पोलीस ठाण्याचे पथक निलंबित)

२००८ मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता.यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते. वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा –Ambuja Cement Share Price : अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरवर परिणाम करणारे ५ महत्त्वाचे घटक )

या प्रकरणातील तत्कालीन तालुका प्रमुख आणि इतर तीन जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचे काढलेले वाॕरंट विना तामील झाले होते. त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता. पुन्हा न्यायालयाने दंड लावला आणि नवीन जामीन देण्याचा आदेश चौघांना दिला होता. रीतसर वकिलामार्फत जामीन मिळाला आहे. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.