राज ठाकरे एकमेव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार! मनसैनिकांची बॅनरबाजी

96
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा काही वेळातच होणार आहे. त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक औरंगाबाद येथे आले आहेत. त्यावेळी मनसैनिक राज ठाकरे यांचा ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे एकमेव राजकीय वारसदार’ असा उल्लेख करणारे बॅनर घेऊन सभास्थळी येत होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे मनसैनिक आता हिंदुत्ववादी नेते म्हणून पाहू लागले आहेत.

राज ठाकरेंचा हिंदुत्ववादी नेता म्हणून स्वीकार 

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. तेव्हापासून शिवसेनेच्या अस्तित्वावर गदा येणार अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे शिवसेनाही सतर्क झाली आणि आपल्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा सुटू नये म्हणून तातडीने उपाययोजना सुरु केली. राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह भाषण करताना राज ठाकरे यांचे हिंदुत्व म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे. लोकांना पटले तर घेतील नाहीतर नाकारतील, अशी टीका केली. प्रत्यक्षात मात्र राज्यभर राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे, याची प्रचिती औरंगाबाद सभेच्या आधीच दिसून आली. मनसेच्या सभेसाठी येणारे शिवसैनिक विविध आशयाचे बॅनर घेऊन येत होते. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकमेव राजकीय वारसदार राज ठाकरे आहेत, असा उल्लेख त्यात केला आहे. त्याच वेळी राज ठाकरे यांचे जागोजागी स्वागत केले, तिथे भगव्या रंगाची शाल पांघरून त्यांना हिंदुत्वाचे नेते म्हणून त्यांचा गौरवण्यात येत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.