मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. यात जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असे देखील पोलिसांनी म्हटले आहे.
कोणत्या आहेत अटी?
पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये ही सभा रविवार, १ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ९.४५ या वेळेतच आयोजित करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असे म्हटले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये, अथवा प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा औरंगाबादमध्ये ‘राज’ गर्जना होणारच! अखेर अटी-शर्थीने परवानगी मिळाली )
Join Our WhatsApp Community