मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस दिल्या आहेत. त्याअंतर्गत मनसेचे नेते महेश भानुशाली यांना अटक केली आहे. पोलिसांची मनसेच्या विरोधातील ही पहिली कारवाई आहे.
भोंगे जप्त केले
मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात ४ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईत पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले आहेत. तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीच साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. महेश भानुशाली घाटकोपरमधील चांदिवली मतदारसंघात मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्या कार्यालयातील भोंगे ताब्यात घेतले आहेत. तसेच उद्याच्या आंदोलनासाठी जमा केलेले साहित्यही जप्त केले आहे. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Join Our WhatsApp Community