ज्या दिवशी शिवराय अंगात येतील, त्या दिवशी जग पादाक्रांत करू! राज ठाकरेंकडून डॉ. आंबेडकरांचे वाक्य अधोरेखित

110

औरंगजेब इतका मोठा राजा महाराजांना मारायला इथे महाराष्ट्रात आला. तो आला त्याच्या आधीच महाराज गेले होते. त्याला हे माहित नव्हते का, तरीही तो इथे आला, २७ वर्षे राहिला आणि इथेच मेला, परत आग्र्याला गेला नाही. १७६० तो मेला. त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजी राजे, ताराराणी असे अनेक जण लढले. औरंगजेबाने अनेक पत्रे लिहिली त्यात तो म्हणतो शिवाजी अजून मला छळतो, तो जाणून होता शिवाजी हा विचार आहे, तो विचार संपवला पाहिजे आणि तेच झाले. आज सगळा इतिहास आम्ही विसरलो. आम्ही फक्त महापुरुषांच्या पुण्यतिथी, जयंती साजऱ्या करतो. डॉ. आंबेडकरांचे वाक्य आहे आमच्या लोकांच्या अंगात देवी, भुते येतात, जेव्हा आमच्या अंगात शिवाजी नावाचे भूत येईल, तेव्हा जग पादाक्रांत करू. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत म्हटले.

(हेही वाचा एकदा काय ते होऊनच जाऊदे! महाराष्ट्राच्या मनगटाची ताकद दाखवून द्या! राज ठाकरेंचा भोंग्यांवरून इशारा)

जो समाज इतिहास विसरतो, त्याच्या पायाखालच  भूगोल सरकतो 

संभाजीनगरचे मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याआधीचा पैठण. आजचा महाराष्ट्र दिन साजरा करताना आधी महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालची जमीन सटकली, भूगोल सटकला आहे. आपण कोण आहोत, हे जाणून घेतले पाहिजे. संत ज्ञानेश्वर गेले आणि अल्लाउद्दीन खिलजी आला आणि तो देवगिरीच्या किल्ल्यात शिरला, १ लाख लोक घेऊन आला, अशी आवयी उठली. आमचा राजा बेसावध राहिला. किल्ल्यात फितुरी झाली. प्रत्यक्षात खिलजी आला तेव्हा एक लाख सैन्य नव्हते. तेव्हाची ती पहिली फेक न्यूज होती. आमच्या महाराष्ट्राची कन्या खिलजी पळवून गेला. पुढची ४०० वर्षे महाराष्ट्र खितपत होता. माता-भगिनींवर अत्याचार होत होते, बलात्कार होत होते, त्याच पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी आरोळी ठोकली ‘दार उघड बये दार उघड’ आणि १६३० ला दार उघडले, शिवरायांचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसे जगायचे हे आमच्या महाराजांनी शिकवले. महाराज गेले. अफझल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली इतकेच आपल्याला माहित, इतिहास कधी आपण समजूनच घेतला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी! १५ वर्षे जातीवरून माथी भडकावली! राज ठाकरेंचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.