मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे चर्चेत आहेतच. गुढी पाडव्याला केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे चर्चेत आले होते. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांसाठी आनंदाचे वातावरण आहे. राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरेंना पुत्रलाभ झाला आहे. अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतिर्थावर उत्साही वातावरण आहे. अमित आणि मिताली 27 जानेवारी 2019 या दिवशी विवाहबंधनात अडकले होते. हे त्यांचे पहिले अपत्य आहे.
ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण
मंगळवारी सकाळी राज ठाकरेंना नातू झाल्याची बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरताच मोठा उत्साह केला जात आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमध्ये आई- मुलगा सुखरुप आहेत. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचे समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आणि कुटुंबिय आनंदीत झाले आहे.
( हेही वाचा: शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात, आता सेनेकडे उरले काय? )
शुभेच्छांचा वर्षाव
ही जशी ठाकरे कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी आहे. तशी मनसैनिकांसाठीही आनंदाची बातमी आहे. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज ठाकरे यांची आजोबा झाल्यावर काय प्रतिक्रिया असेल यावर कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मंडळींनी राज ठाकरे आणि मुलाचे बाबा अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.