कोणालाही आता इतिहासतज्ज्ञ झाल्याचे वाटते; महापुरुषांच्या अवमानावरून राज ठाकरे यांचा टोला 

141

सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. सध्या सुरु असलेले राजकारण नव्हे, राणे, राऊत काय बोलले यात कोणाला रस नाही, महापुरुष, जातीवरुन राजकारण करणे चूक आहे, कोणालाही आपण इतिहासतज्ज्ञ आहोत असे वाटू लागले आहे, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. सध्या राज्यात महापुरुषांच्या अपमानावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यावर राज ठाकरे यांनी थेट भाष्य केले. पुण्यात सुरू असलेल्या १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

एक-दोन उद्योग राज्याबाहेर गेल्याने फरक पडत नाही

महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचे काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. आपल्याकडे जे आहे, ते जरी टिकवले तरी महाराष्ट्र सर्वांच्या पुढे आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसने गरजेचे आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, घटनेच्या विरोधात जाऊन एकाच राज्याला प्राधान्य दिले जाते, असे वाटत नाही का? असा प्रश्न विचारला असता, हे मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो. मात्र, त्यावेळी सर्वांचा शहांमृग झाला होता, असे म्हणत माझे आजही म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे एकसमान नजरेने बघितले पाहिजे. आपण गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे, हे एका पंतप्रधानला शोभा देत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीर चक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

मोदींच्या विरोधात व्हिडीओ का दाखवले?

२०१४ ची माझी भाषणे काढून बघितली तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावे, असे मी म्हणालो होतो. यावर म्हणून तुम्ही २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’ सुरू केला होता का?’ असे विचारले असता, एकाद्या भूमिकेला विरोध करणे हे चुकीचे नाही. जर त्या व्यक्तीने चांगली गोष्ट केली तर त्यांचे अभिनंदन करावे इतका मनाचा मोठेपणाही तुमच्याकडे असावा लागतो. २०१४ नंतर देशात जे राजकीय स्थित्यंतर झाले त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यामुळेच ‘लाव रे तो व्हिडीओ’ची भूमिका घेतली होती. मात्र, २०१९ नंतर राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० अशा अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे अभिनंदनही मी केले, असेही राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.