Raj Thackeray : बारसू प्रकरणी राज ठाकरे सरकारवरच बरसले; म्हणाले… 

आमच्याही जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाहीय. किती काळ रडत बसणार आहात?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

235
बारसू प्रकरणी राज ठाकरे सरकारवरच बरसले; म्हणाले... 
बारसू प्रकरणी राज ठाकरे सरकारवरच बरसले; म्हणाले... 

सध्या राज्य सरकारवर बारसू रिफायनरी जोरदार टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, ६ मे रोजी बारसूत जाऊन नंतर महाड येथे जाहीर सभेत बोलताना प्रकल्पाला विरोध केला, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रत्नागिरीत सभेत बोलताना बारसू प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे तुमचे अस्तित्व संपेल, तसेच तुमची भाषाही गायब होईल, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभ्या आहेत. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांचा इतिहास म्हणून पाहिला तर तो इतिहास भुगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादक्रांत केली, जमीन ताब्यात घेतली. या देशाची, प्रदेशाची जमीन ताब्यात घेतोय. हे जमीन ताब्यात घेतो ना त्याला इतिहास म्हणतात, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या महाराष्ट्राचा भगवा अटकेपार फडकवला. अटकेपार म्हणजे काय? पाकिस्तानात अटक नावचा जिल्हा आहे. ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे अटकेपार. जमीन पायाखालची काढताय आणि कोणत्या तरी व्यापाऱ्यांना विकताय, आपण कोणासाठी जमीन सोडतोय, काय करतोय याचं भान नाही आपल्याला. तो दाभोळला एन्रॉनचा प्रकल्प आला, तेव्हाही विरोध झाला. तेव्हा जमीन विकली कोणी? तुम्ही. तुम्हाला माहितच नव्हतं येथे प्रकल्प येणार. अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे माहितच नव्हतं. पण जमिनी विकून मोकळे झालात. पण हजारपट किंमतीला परप्रांतीयांनी जमिनी विकल्या. नाणारलाही तेच झालं, बारसूलाही तेच झालं. आमच्याही जमिनी पायाखालून जातायत, तुम्हाला कळतच नाहीय. किती काळ रडत बसणार आहात?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

(हेही वाचा Raj Thackeray : शरद पवारांना खरचं राजीनामा द्यायचा होता; पण…राज ठाकरेंनी केला दावा )

नाणार, बारसू प्रकरणानंतर मला संताप झाला होता. मला एकदा येऊन कोकणवासियांशी बोलायचंच होतं. माझ्या कोकणातील तरुण तरुणींना रोजगार हवाय. काय नाही दिलं या कोकणाला. ज्या गोष्टी कोकणात आहेत, त्यात एक केरळसारखं राज्य चालू आहे. आपण काय घेऊन बसलोय. हे प्रकल्प कधी केरळात नाही जात. गोव्यात नाही जात. तुमच्याकडे निसर्गाने ओतलंय त्याची आम्हाला किंमतच नाही. कारण आमचा एकमेकांशी संबंधच येत नाही. फक्त गणपती होळीपुरता संबंध येतो. काय नाहीय येथे, असंही राज ठाकरे म्हणाले. युनेस्कोने या बारसूमधील कातळशिल्पाकडे लक्ष दिले आहे, त्याला विशेष दर्जा दिला आहे. त्यावर संशोधन सुरु आहे. असे असेल तर त्या भागात कुठेही विकास करता येत नाही, केंद्र सरकारला हे कधीच करता येणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.