मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पुणे येथे झालेल्या सभेत टीका करणा-या सर्वांवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच अनेक मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचाः म्हणून मी माझा अयोध्या दौरा रद्द केला… राज ठाकरेंनी सांगितलं धक्कादायक कारण)
केल्या या तीन मागण्या
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे. त्यांनी लवकरात लवकपर समान नागरी कायदा आणावा, या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अजून एक कायदा आणावा आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करुन टाका, अशा तीन मागण्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. ही मागणी पूर्ण करुन यांचं राजकारण मोडून काढा.
(हेही वाचाः काय वॉशिंग पावडर विकताय का? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)
राजकारणासाठी एमआयएमला मोठं केलं
यांनी यांच्या राजकारणासाठी एमआयएमला मोठा केला. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमकडून हिंदू विरोधी भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. पण यांच्या एक लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवत आहोत. आणि म्हणता म्हणता तिथे एमआयएमचा खासदार होऊन, या निजामाच्या औलादी महाराष्ट्रात येऊ लागल्या. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community