शरद पवारांनी नाकारली होती पुणेरी पगडी; Raj Thackeray यांनी दिला पुरावा

115
शरद पवारांच्या जातीयवादाचा Raj Thackeray यांनी दिला पुरावा; म्हणाले पुण्यातील फुटेज पहा...
शरद पवारांच्या जातीयवादाचा Raj Thackeray यांनी दिला पुरावा; म्हणाले पुण्यातील फुटेज पहा...

शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण जातीयवादी (communalism) असल्याचे एक उदाहरण तरी द्या, असे म्हणाले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्याचे उदाहरण दिले. राज ठाकरे म्हणाले, एक उदाहरण सांगतो. सोपे उदाहरण आहे. त्याचे फुटेज सर्वांकडे आहे. भुजबळांना पुण्यात पुणेरी पगडी घातली. पवारांनी ती काढली आणि ज्योतिराव फुल्यांची पगडी घातली. ज्योतिराव फुल्यांची पगडी घालण्याबाबत काही म्हणणे नाही. पण ही घालू नका, ही घाला. ते फुटेज पाहा. सत्काराच्या वेळी हे घडले होते, असा स्पष्टच संदर्भ राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यानंतर दिला. ‘टीव्ही 9 मराठी’ वाहिनीवरील मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले.

(हेही वाचा – World Pneumonia Day : जागतिक न्यूमोनिया दिन का पाळला जातो? काय आहे महत्त्व?)

त्यांना वयानुसार गोष्टी आठवत नाहीत

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, अशी टिकाही शरद पवार यांनी केली आहे. त्याविषयीही राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज म्हणाले, ”शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या, त्याची पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जात-पात पाळली नाही. मी जातीवादी राजकारण केले नाही. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची, हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या, त्यांना पैसे पुरवायचे या गोष्टी सर्वांना माहीत आहे. काही गोष्टी मला व्यक्तीशः बोलायच्या नाहीत. नाही तर त्याही बोललो असतो. पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही.”

… तर लाच म्हणेन

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) टिकली दर महिन्याला टिकवता आले तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला लाच म्हणेल, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वेळी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.