कल्याणच्या घटनेवर Raj Thackeray संतापले, ‘एक्स’वर पोस्ट करत म्हणाले, महाराष्ट्र सैनिकांनी हल्ला…

180

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा (Kalyan ajmera Society Dispute) सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रकरणांवरून राजकारणही तापले आहे. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मिडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. (Raj Thackeray)

तसेच कल्याण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कायद्याचा धाक म्हणजे काय ते दाखवा आणि सरकार हे करू शकत नाही, मग महाराष्ट्र सैनिकांनी (MNS) हल्ला केला तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

संताप व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राबाहेरून आलेले सर्वच महाराष्ट्रद्वेषी नाहीत, अनेक अमराठी इथल्या मातीत मिसळून राहिलेले आहेत हे देखील त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, “कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची की नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही!”. 

कल्याणच्या त्या घटनेवर खासदार आमदार व्यक्त का होत नाहीत?

जेथे हा प्रकार घडला तेथील आमदार खासदार या प्रकरणावर व्यक्त होत नाहीत हा मुद्दा देखील राज ठाकरे यांनी मांडला आहे. ते म्हणाले की, “कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार (Kalyan MP,MLA) हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे.

(हेही वाचा – Water : मुंबईतील वाढती पाणी समस्या दूर करण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी)

तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ…

“अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण (Ladaki Bahin) नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ….”, असेही ठाकरे ( Raj Thackeray) म्हणाले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.