महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची एक वीट भेट म्हणून दिली. ही भेट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. ६ डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते. एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिली आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येतील कारसेवेत बाळा नांदगावकरांचाही समावेश होता. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचे वजन जास्त होते. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामे कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. (Raj Thackeray)
(हेही वाचा – कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट दिले कार्यकर्त्याला; Rahul Gandhi झाले ट्रोल)
दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे बोलताना म्हणाले की, तेव्हाची बांधकामे का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटे निघायची नाहीत, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘ती वीट सुद्धा लवकरच मिळवीन’
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “बाळासाहेब असते, तर ही वीट घेताना त्यांना आनंद झाला असता. ही वीट म्हणजे ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला अशीच राम मंदिराची एक वीट हवी आहे. मंदिराचं बांधकाम अजून सुरु आहे, त्याची सुद्धा एक वीट मी लवकरच मिळवीन.
(हेही वाचा – BJP कडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात; ‘रामलला’चे दर्शन घडवणार; पण मोफत की सवलतीच्या दरात?)
बाळा नांदगावकर म्हणाले की,
मी दोन विटा आणल्या होत्या. माजगावचे कार्यालय बांधताना तिथे खाली एक वीट ठेवली होती. ते कार्यालय मी मनसेत आल्यानंतर शिवसेनेला सुपूर्त केले होते. आता ते कार्यालय यशवंत जाधव यांनी गिळंकृत केले आहे. दुसरी वीट मी ३२ वर्षांपासून जपून ठेवली होती, असे त्यांनी म्हटले आहे. (Raj Thackeray)
बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, राज ठाकरेच (Raj Thackeray) आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली. तो प्रसंग फार बाका होता. तेव्हा माहिती नव्हते की परत जिवंत येऊ की नाही. माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. त्याला आता 32 वर्ष झाली. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community