मशिदींवर लागणारे भोंगे हे खाली उतरावे लागतीलच, सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल, नाही तर ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट भोंगे लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही. पण जेव्हा धर्म बनला, तेव्हा लाऊड स्पीकर होता का? युरोपमध्ये कुठे स्पीकर दिसतो. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे, आमच्या मंदिरात धाडी टाका, काय मिळणार घंटा. म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेल्या समाजाचे नेतृत्व करण्याची मला इच्छा नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात निर्वाणीचा इशारा दिला.
मदरशांमध्ये धाडी टाका!
आज या महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर चालताना वाहतूक कोंडी वाढलेली दिसते. मी महाविद्यालयात जात होतो तेव्हा बेहरामपाड्यात ४-५ झोपड्या दिसायच्या, आज तिथे ४-५ माजली झोपड्या झालेल्या दिसतात. मातोश्रीतून बाहेर पडल्यावर हा बेहराम पाडा दिसतो, असे बेहरामपाडे मुंबईत सगळीकडे वाढत आहेत. झोपडपट्यांमध्ये, मदरशांमध्ये धाडी टाका, घबाड मिळेल. पाकिस्तानची गरजच नाही. जर प्रसंग आला तर आवरता येणार नाही. अनेक गोष्टी मशीद, मदरशांमध्ये सुरु आहेत, एकदा पोलिसांना विश्वासात घेऊन माहिती घ्या. सगळे पाकिस्तानमधून चालवले जात आहे. आमच्या आमदार, खासदारांना याचे काही पडले नाही. पाकिस्तान, बांगलादेशातून येणाऱ्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड पुरवली जातात. उद्या हेच आपल्या अंगावर येतील, तेव्हा पश्चाताप होईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
(हेही वाचा मनसेच्या मेळाव्यात ‘जय श्रीराम’च्या घोषणा)
Join Our WhatsApp Community