राज ठाकरेंनी सांगितली हिंदू शब्दाची व्याख्या! 

142

तुम्ही कोणत्या हिंदुत्वाचा ध्वज घेत आहात? १९४७ सालीचा हा देश झाला त्याआधी या देशात हे एक भूमी होती. १२०० वर्षांपूर्वी गझनी आला नंतर खिलजी आला नंतर मुघल आले, ९०० वर्षे देश पारतंत्र्यात होता, पण आपण आपली संस्कृती विसरलो का, आजही आपण गुढी उभारतो, आपली भाषा, पोशाख परकीय आक्रमणकर्ते हिसकावू शकले नाही, कारण आपली ही संस्कृती होती, सगळ्या राज्यांनी त्यांची संस्कृती जोपसली, तर हिंदूच मोठे होणार आहे, पण त्यासाठी जातीपातीतून बाहेर पडावे लागेल, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या सांगितली. मी नक्की अयोध्येला जाणार, पण आता तारीख सांगत नाही, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण सुरु 

जातीपातीत गुंतून पडणार असाल, तर कुठले हिंदुत्व घेऊन बसता. हिंदू-मुसलमान दंगलीत तुम्ही हिंदू असता, २६ जानेवारीत तुम्ही भारतीय असता, चीन आक्रमण करतो तेव्हा तुम्हाला कळत नाही तुम्ही कोण आहात, जेव्हा काहीच घडत नसते, तेव्हा तुम्ही मराठी होता, जेव्हा मराठी होता, तेव्हा तुम्ही मराठा, कुणबी, वाणी होता. हेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाहिजे असते. १९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालणे सुरु झाले. मराठा आरक्षण, बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट बनले कारण ते ब्राह्मण होते. ज्या शिवरायांनी जातीपाती गाडून टाका म्हटले होते, त्या जातीतून आपण कधी बाहेर पडणार, तोवर आपण हिंदू बनणार नाही. इतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु असते तसे राजकारण करायचे आहे का? १९९९ च्या जन्मानंतर जेम्स लेन जन्माला आला. कोण होता तो? आधी तो आम्हाला माहित नव्हता. त्या भिकारड्याने लिहिले होते, ते आम्ही उगाळत राहिलो, इथे राजकारण जाणीवपूर्वक तापवले जाते, ज्यांचा संबंध नाही असे जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा लाज वाटते. आपणच आपली लाज काढत आहोत. एकमेकांची डोकी फोडायला तयार आहोत. जातीपातीतून बाहेर पडायला तयार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा …तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार! राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.