इतर सर्व पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Raj Thackeray) देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच बुधवार १६ ऑगस्ट रोजी पनवेल मध्ये मनसेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. छगन भुजबळ यांचा जेलमधील अनुभव ऐकून अजित पवार यांनी भाजपमध्ये उडी मारली, अशा भाषेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे हे सगळे टोणगे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. सर्वांनी टुणकण भाजपमध्ये उडी मारली अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
(हेही वाचा – Chandrayaan-3 : यान चंद्राच्या शेवटच्या कक्षेत दाखल)
अजित पवार गटावर टीका करताना राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले, मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर लगेच राष्ट्रवादीतील टोणगे टुणकण भाजपसोबत गेले. कदाचित छगन भुजबळांनी त्यांना सांगितले असेल की, आत (तुरुंगात) काय काय असते. छगन भुजबळांनी सांगितले असेल मी आत (तुरुंगात) जाऊन आलो आहे. त्यामुळे आत जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेले चांगले. त्यामुळे हे सर्वजण ‘आत’जाण्यापेक्षा भाजपसोबत गेलेलो बरे, असे विचार करून सत्तेत सहभागी झालेल असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community