राज ठाकरे मुन्नाभाई! उद्धव ठाकरेंचा घणाघात

82

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बीकेसीत भव्य सभा घेत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे. अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले आहेत की, ”मुन्नाभाई चित्रपटात त्याला गांधीजी दिसतात, तसे एकाला बाळासाहेब दिसतात, नाव न घेता त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अशी टीका केली आहे.

(हेही वाचा टीनपाटांना सुरक्षा दिली, बापाचा पैसा आहे का? उद्धव ठाकरेंचा केंद्रावर घाला)

मागील महिनाभरापासून भाजप, मनसेच्या सभा होत आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्याला उत्तर म्हणून शनिवारी, १४ मे रोजी वांद्रे, बीकेसी येथे शिवसेनेची जाहीर सभा घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ‘संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. स्वतःला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झाला आहे, असे मुन्नाभाई फिरताहेत.’ आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ‘आता आदित्य तिरुपतीला गेला होता, आता अयोध्येला जाईल. रामजन्मभूमीला मी जाताना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्याचे भांडवल आम्ही केले नाही.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.