- प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती असे सांगण्यात येत आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची बैठक अर्धवट सोडून राज यांनी मुख्यमंत्र्यांची घाईघाईने आणि अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – Israel and Hezbollah Conflict : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला; 100 लोकं ठार, 300 हून अधिक जखमी)
लोकसभेत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेने राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. स्वतः राज (Raj Thackeray) यांनी ही घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांनी पक्ष संघटनेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली. तसेच त्यांनी यासाठी राज्यभरात दौरा देखील केला होता. त्यामुळे ते स्वबळावर लढणार, अशी चर्चा सुरू होती. अशातच मनसेचा फायदा नेमका महायुतीला होणार की महाविकास आघाडीला याची चर्चा रंगली आहे. अशातच येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज यांनी शिवतीर्थावर मनसे नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.
(हेही वाचा – Hawkers : डिसिल्व्हा गल्लीतील मराठी भाजी आणि फळ विक्रेते गेले कुठे?)
उमेदवार, जागा निश्चिती, उमेदवारांना बळ देणे आणि सभा, दौरे आदी नियोजनावर यावेळी चर्चा सुरू होती. मात्र अचानकपणे ही बैठक सोडून राज (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास खलबत झाली. परंतु, दोघांनी या भेटीवर बोलण टाळले आहे. त्यामुळे या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? किंवा विधानसभा निवडणुकीबाबत काही चर्चा झाली का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community