विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्ते असेल, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. तसेच टोलमाफीबद्दल राज्य सरकारचे त्यांनी आभारही मानले. दि. १६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
( हेही वाचा : SpiceJet चा गलथान कारभार; मुंबईहून आयोध्येकडे जाणाऱ्या प्रवाशांची विमानाअभावी विमानतळावर तासनतास रखडपट्टी )
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आम्ही जोशात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मी जे बोललो ते फक्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी बोललो नाही, तर खरच विधानसभा निवडणुकीनंतर मनसे पक्ष सत्तेत असेल. त्यात मनसे सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा लढवत असल्याचे ही ते म्हणाले.
पुढे (Raj Thackeray) ते म्हणाले, राज्य सरकारने टोलमाफी सारख्या महत्त्वाच्या निर्णय घेतल्याने लोकांना समाधान आहे. आता याचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण येतील. परंतु त्याचा कधीच याप्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. टोलामाफीसाठी कोणी आंदोलन केले हे जगाला माहिती आहे, अशी टीका ही (Raj Thackeray) ठाकरेंनी केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community