…म्हणून राज ठाकरेंनी मास्क लावला!

पितृतुल्य बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायला जाताना राज ठाकरे यांनी केवळ बाबासाहेबांच्या तब्येतीच्या काळजीसाठी मास्क लावून स्वतःच्या नियमाला अपवाद ठरवले.

79

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे नाते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. बाबासाहेबांना कायम पितृतुल्य मानणारे राज ठाकरे पुण्याला जेव्हा येतात, तेव्हा बाबासाहेबांना भेटल्याशिवाय कधीच परतत नाहीत. सध्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यात व्यस्त राहूनही वेळ काढून राज अखेर बाबासाहेबांना भेटायला गेले, तेव्हा मात्र राज यांनी मास्क लावून बाबासाहेबांप्रती काळजीचे दर्शन घडवून दिले.

राज यांच्या कृतीने भुवया उंचावल्या!

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु प्रारंभीपासून राज ठाकरे यांनी हा नियम स्वतःसाठी अपवाद ठरवला आणि मास्क न लावण्याचा नियम लावून घेतला. सार्वजनिक कार्यक्रमात वावरताना राज मास्क शिवाय दिसायचे, तेव्हा राज कायम चर्चेत राहिले. अगदी राजकारणीही राज यांच्याविषयी याबाबतीत टीकाटिप्पणी करत असत. असे राज ठाकरे जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीसाठी गेले, तेव्हा मात्र राज ठाकरे यांची कृती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.

(हेही वाचा : नानांना लवकरच लॉटरी लागणार, अस्लमभाईंचा पत्ता कटणार?)

…आणि राज यांनी स्वतःचा नियम स्वतःला अपवाद ठरवला!

पितृतुल्य बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायला जाताना राज ठाकरे यांनी केवळ बाबासाहेबांच्या तब्येतीच्या काळजीसाठी मास्क लावून स्वतःच्या नियमाला अपवाद ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले, तसे महाराष्ट्रातील शिवकालीन खराखुरा इतिहास, त्याची साक्षी पुरावे बाबासाहेबांकडून समजून घेण्याचा राज यांना छंद आहे. त्यामुळे बाळासाहेब हे राज ठाकरे यांच्यासाठी तसे गुरुस्थानी आहेत. तसे बाबासाहेब हेदेखील राज यांच्यासाठी गुरुसमान आहेत. मंगळवारी, २० जुलै रोजी राज त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांनी मास्क लावून एकप्रकारे बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. यामुळे राज यांच्या हळव्या मनाचे दर्शन यानिमित्ताने झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.