राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी (13 जून) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण 200 ते 225 विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय, असे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray)
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे आता जनता मनसेची वाट पाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण विधानसभेला 200 ते 250 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत, असे राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य पाहता मनसे पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray)
“ठाकरे गटाला मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही. बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे, हे देखील अमित शहांना सांगितलं आहे.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) बैठकीत म्हणाले आहेत. एक महिन्याने संपूर्ण राज्यातला मतदारसंघ आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होईल. राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम बनवल्या जाणार. या सर्व टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेतील. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय माहिती मागवतील ती लवकरात लवकर द्यावी पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न करण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली. युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका, असे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community