विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) दारुण पराभव झाला आहे. परिणामी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे मनसे येत्या महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवाजी पार्कजवळील (Dadar Shivaji Park) ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. (Raj Thackeray)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ०७ जानेवारी रोजी आढावा बैठक (MNS Meeting) घेण्यात आली. यामध्ये ‘शिवतीर्थ’वर मुंबईतील ३६ विभाग अध्यक्षांनी बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता मनसेची ही बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच विधानसभेत जे झाले, ते विसरा, असा सल्ला देत महापालिका निवडणुकीच्या तयारी लागा अशा सूचना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या विभाग अध्यक्षांना दिल्या आहेत.
(हेही वाचा – Daulatabad Fort कोणी बांधला होता? काय आहे किल्ल्याचं वैशिष्ट्य?)
महापालिका निवडणुकीसाठी मनसेची टीम
महापालिका निवडणूकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. ही टीम राजकीय स्थितीचा आढावा घेईल. आगामी निवडणुकीत मनसेची राजकीय वाटचाल तसेच इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा, याबाबतचे अंतिम निर्णय घेताना राजकीय आढावा घेणाऱ्या या टीमची मते लक्षात घेतली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. मनसेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १३० हून अधिक जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. माहिम मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community