नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवार दि. ७ जुलै २०२३ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
(हेही वाचा – भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशसह ४ राज्यांतील निवडणूक प्रभारींची केली घोषणा)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा न लावण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, या संदर्भात २० एप्रिल २०२३ रोजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेने सक्तीची वसुली केल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आणि इतर प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community