कोविड काळात मास्क न लावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर कोविड झाल्याचे वृत्त मिळत आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा आणि स्वतः राज ठाकरे यांना कोविडची बाधा झाली आहे. या दोघांना सौम्य लक्षणे आहेत. तर त्यांच्या नोकरलाही महापालिकेने विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
राज ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांचे मुंबईसह इतर ठिकाणचे दौरे रद्द झाले होते. त्यामुळे त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज ठाकरे हे घरीच असून त्यांच्या आईला लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. पण त्यांची तब्येत स्थिर असल्याचे बोलले जाते. तर त्यांच्या नोकराला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याला पुष्टी दिली आहे. पहिल्या दिवसापासून मास्क लावत नव्हते, जेव्हा पहिल्या टप्प्यात सर्व पक्षीय बैठकिला न मास्क लावता मंत्रालयात गेले,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारील खुर्ची होती. दुसऱ्या टप्प्यात नाशिकचे माजी महापौर मुर्तडक याना मास्क काढायला लावले होते. असे काही राज ठाकरे यांचे कोरोनातील किस्से आहेत. त्या राज ठाकरे यांना अखेर कोरोनाने गाठले
ReplyForward
|