महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेमध्ये दिलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या अल्टीमेटमनंतर राज्यात अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत सांगितले की, जिथे अजान वाजणार तिथे हनुमान चालिसा लागणारच.
सामंजस्याने हा विषय हाताळला जावा
मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. 135 मशिदींवर सकाळी 5 च्या आत अजान लावली गेली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोन करुन सांगितले. या मशिदींवर सरकार काय कारवाई करणार की आमच्यावरच कारवाई होणार. सामंजस्याने जर सगळ्यांनी हा विषय हाताळला, तर सगळं निट होईल. आम्ही फक्त बोललो लोकांनी ही गोष्ट मानली. सरकारपर्यंत हा विषय पोहचला. हा एक कलेक्टीव इफर्ट आहे. लोकांना होणारा त्रास कमी व्हावा, अशी अपेक्षा आहे. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: राणा दाम्पत्याच्या अडचणी संपेना…महापालिकेने बजावली नोटीस )
…तर हनुमान चालिसा लागणारच
मशिदींवरील भोग्यांना परवानगी दिली. अनधिकृत मशिदींवर अनधिकृत भोंगे लावले जातात. या अनधिकृत भोंग्यांना सरकार अधिकृत परवानगी देते कशी ? हा प्रश्न केवळ माझा नाही तर सर्व सामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. असे असूनही जर भोंगे खाली उतरवले जाणार नसतील, तर मशिदींसमोर तिप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाणार. हा काही धार्मिक विषय नाही. सामाजिक विषय आहे, असे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.