छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांवर राज ठाकरे म्हणाले…

149
सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर उलटसुलट चर्चा सुरु आहे, ज्यामुळे राज्यात जोरदार वाद सुरु आहे. यावर कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून काही शिकू नका, जे महाराजांनी सांगितले, शिकवले, त्या गोष्टी करू नका, फक्त नको ते वाद करत बसायचे, माहित नसेल, वाचन नसेल तर तज्ज्ञांकडून माहिती करून घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे? 

कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षासाठी कोकणात सकारात्मक वातावरण वाटत आहे. त्यामुळे कोकणात दोन सभा घेणार आहे असे सांगत कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, परंतु महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाणार असतील, तर तेही अयोग्य आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, कोणीही उठून इतिहासावर बोलणे योग्य नाही. ज्यांना चित्रपटाबाबत आक्षेप असतील त्यांनी जे सिनेमा करतात  त्यांच्याशी बोलावे, इतिहास हा वृक्ष आहे, तो सिनेमात रंजक करुन दाखवला तरच लोक पाहतात, असे राज ठाकरे यांनी सिनेमा वादावर भाष्य केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.