“…तर महाराष्ट्र बरबाद होणार”, Raj Thackeray यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांसह ठाकरेंना सुनावलं

164
"…तर महाराष्ट्र बरबाद होणार", Raj Thackeray यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांसह ठाकरेंना सुनावलं

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महायुती सरकारला सुनावलं आहे. महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली. असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

“सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात.” असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
पुढे बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय! मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?”

शरद पवारांना सुनावलं
“शरद पवार (Sharad Pawar) सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? शरद पवार नास्तिक आहेत, असं खुद्द त्यांची लेक सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितलं होतं. पण मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते सर्व मंदिरात जाऊन पाया पडायला लागले. पण त्यांचे हे पाया पडणंही खोटं आहे.” (Raj Thackeray)

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा
“मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार (Ajit Pawar) भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?” असा सवाल राज ठाकरेंनी केला. (Raj Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.