Raj Thackeray : पुन्हा एकदा ‘लाव रे व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये

151
Raj Thackeray यांचे विधानसभेसाठी भाजपाशी युतीचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) म्हणजेच मनसेचं आंदोलन हे नेहमीच आक्रमक असत. मग ते दुकानांवरील मराठी पाट्या संदर्भात असो किंवा मग टोलवधीच्या विरोधात. अशातच आता मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने महाराष्ट्रातील टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी आज म्हणजेच सोमवार ९ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे काही व्हिडीओ क्लिप दाखवून हा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

टोलमुक्त महाराष्ट्रासाठी आतापर्यंत काय-काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं? या सर्वाचा लेखाजोखा राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून मांडला आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

टोल हा सर्वात मोठा स्कॅम आहे

राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे बोलतांना म्हणाले की; “ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली, त्याविरोधात मनसे आमदार अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मी कालही याबाबत बोललो होतो, पण मुद्दाम आज पुन्हा सांगतोय. मला यासंदर्भात राज्य सरकारकडून एक पत्र आलं, त्या पत्रात एक स्तंभ होता. त्यात कोणत्या वाहानांना टोल आहे आणि कोणत्या वाहानांना टोल नाही, हे नमूद करण्यात आलं होतं. साधारणतः 2010 मध्ये टोल आंदोलन सुरू झालं. टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा, याचं होतं काय? त्याच-त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतात? शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?”

(हेही वाचा – India China Dispute : भारत चीन वाद सोडवण्यासाठी भारताने उचलले ‘हे’ पाऊल)

लाव रे तो व्हिडीओ …

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय म्हणालेले, हे काही क्लिपमधून पाहुयात, असं म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा लाव रे व्हिडीओ याची आठवण करून दिली. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एक-एक मिनिटांच्या क्लिप भर पत्रकार परिषदेत दाखवल्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या टोलनाक्यासंदर्भातील त्या क्लिप होत्या.

तर टोलनाके जाळून टाकू

प्रवाशांच्या खासगी दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. केवळ व्यवसायिक वाहनांकडून टोल वसुल केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (८ ऑक्टोबर) म्हणाले होते. त्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कडाडून हल्ला चढवला. राज ठाकरे म्हणाले की फडणवीस तसे म्हणत असतील तर आम्ही टोलनाक्यांवर आमचे माणसे उभे करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच (Raj Thackeray) जाळून टाकू असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.