आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याचा दौरा करत आहेत. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केलं. असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे.
“आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी”
“माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषयही नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करत आहेत, ते मला मराठवाड्यात दिसतंय. यातील दुर्देवाचा भाग म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत इन्व्हॉल्व झाले आहेत. मला त्यांची नावेही माहीत आहेत. योग्य ठिकाणी जातील आणि चौकशी होईल. कुणाला पेव्हर ब्लॉकची कामे मिळाली, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाली. कुणाला किती पैसे मिळाले आणि त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या. अशा सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. मी जेव्हा धाराशीवला होतो. तेव्हा धाराशीवला काही लोक भेटायला आले. त्यांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी त्यांना सांगितलं तुम्ही या, तेव्हा तुम्ही खाली जा असं सांगणारे पत्रकार होते. माझ्यासोबत कोण येणार इथपर्यंत प्रकरण झालं.” असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
“माझ्या नादी लागू नका”
“माझ्या दौऱ्यावर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझं मोहोळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत. माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका. तुम्हाला तुमचं राजकारण करायचं आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणतं राजकारण करायचं आहे. यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटतं आमचे एवढे खासदार आले. त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोला. समाजात कशाला भांडण लावत आहात?” असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community