महाराष्ट्रात कुणी विदुषकी चाळे करतो अन् बुजुर्ग म्हणावे तेच…; Raj Thackeray यांचा शरद पवारांना टोला

68
महाराष्ट्रात कुणी विदुषकी चाळे करतो अन् बुजुर्ग म्हणावे तेच...; Raj Thackeray यांचा शरद पवारांना टोला
महाराष्ट्रात कुणी विदुषकी चाळे करतो अन् बुजुर्ग म्हणावे तेच...; Raj Thackeray यांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, तर कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहे. त्यात राजकारण्यांची भाषा खालावली आहे, खालच्या थराला जाऊन टीका केली जात आहे, त्यांना समदावणारं कुणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच या सगळ्यांच्या आहारी गेले, अशी शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता टोला लगावला. गेल्या आठवडयात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केलं. त्यापार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही टीका केली. पुण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

( हेही वाचा : Mayank Yadav : मयंक यादव पदार्पणात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजेत. साहित्यिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. त्यात राजकारणात सध्या जी भाषा वापरली जात आहे, येणाऱ्या पिढ्यांना वाटणार हे राजकारण आहे. त्यामुळे हे सुधारण्यासाठी साहित्यिकांनी खडेबोल सुनावले पाहिजे. आम्ही काय करायचं असतं हे तुम्ही सांगितले पाहिजे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी साहित्यिकांना सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.