मुंबईत पाचही टोलनाक्यांवर वाहनांना टोलमाफी; Raj Thackeray यांच्याकडून अभिनंदन अन् …

233
मुंबईत पाचही टोलनाक्यांवर वाहनांना टोलमाफी; Raj Thackeray यांच्याकडून अभिनंदन अन् ...
मुंबईत पाचही टोलनाक्यांवर वाहनांना टोलमाफी; Raj Thackeray यांच्याकडून अभिनंदन अन् ...

विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting) घेतली. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफ करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर या टोलनाक्यावर टोलमाफी असणार आहे. (Raj Thackeray)

यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरे सोशल मिडीया पोस्ट करत म्हणाले, “मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.”

(हेही वाचा-CM Shinde यांची मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा; मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी)

“पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.” (Raj Thackeray)

(हेही वाचा-Air India Flight: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; विमान थेट दिल्लीच्या दिशेनं वळवलं!)

“महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. (Raj Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.