केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा (Waqf Bill) आणला आहे. बोर्डाची मनमानी कारभार पाहता या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसेच वक्फ बोर्डाने आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी दि. ९ डिसेंबर रोजी केले.
( हेही वाचा : Kurla Best Bus Accident : आरोपी संजय मोरेला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी)
लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगावातील जवळपास १०३ शेतकऱ्यांच्या ७५ टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. यावर राज्य सरकारने कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे म्हटले आहे. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वक्फ बोर्डाच्या मनमानीवर अंकुश कसा आणणार कसा सवाल सरकारला विचारला आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीमुळे लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळाली होती. हा देशासाठीही त्याग होता. वक्फ बोर्ड (Waqf Board) मात्र लोकांच्या जमिनीवर ताबा सांगून त्या हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने (Waqf Board) स्वत: च्या जमिनी सरकारला परत करून राष्ट्रीयत्व दाखवावे, असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. तसेच संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचविणारे विधेयक केंद्राने आणले. विरोधी पक्षांनी विरोध केल्यामुळे ते विधेयक संसदीय समितीकडे हे पुनर्विचारासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने विरोधकांच्या विरोधाला बळी पडू नये, असे ही ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. (Waqf Bill)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community